पुढारी ऑनलाईन डेस्क : दणदणीत विजय मिळवल्यानंतरही भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात विलंब होत असल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत मंथन सुरू आहे. भाजपने छत्तीसगडसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष अरुण साव यांनी आज दुपारी विधीमंडळ पक्षाची बैठक असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी भाजपने निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत कुमार गौतम यांना छत्तीसगडचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्य प्रभारी ओम माथूर, राज्य सहप्रभारी नितीन नबीन आणि नियुक्त निरीक्षक एकत्र बैठक घेणार आहेत. आज तिन्ही निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यादरम्यान छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम घेतील.
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, माजी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई, रामविचार नेताम, अरुण साओ आणि ओपी चौधरी यांच्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा :