दहा कपाटात 300 कोटी! 37 पोती रोकड बाकी!!

दहा कपाटात 300 कोटी! 37 पोती रोकड बाकी!!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील आयकर खात्याच्या छाप्यांत आतापर्यंत 300 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, 10 कपाटे भरतील एवढ्या नोटांच्या मोजणीसाठी 40 यंत्रे वापरण्यात येत आहेत. आणखी 37 पोती नोटा मोजणे बाकी आहे, तर 7 खोल्या व काही लॉकर्सची तपासणी बाकी आहे.

आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी रोकड हाती लागलेले हे पहिले छापे आहेत. छत्तीसगड व ओडिशात छाप्यांत जप्त केलेल्या नोटा मोजण्याचे काम अखंड सुरू आहे. 10 कपाटे भरून 100, 200 व 500 रुपयांचे गठ्ठे हाती लागले. त्यांची मोजणी करण्यासाठी 40 यंत्रे मागवण्यात आली आहेत. अद्याप नोटा भरून ठेवलेली 37 पोती उघडणे बाकी आहे. सात खोल्या व काही लॉकर्सची झाडाझडती बाकी आहे. आतापर्यंत मोजलेल्या नोटांचे मूल्य 300 कोटी रुपये झाले असून, या नोटा बँकेत जमा करतानाही यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. इतक्या नोटा ठेवण्यासाठी बँकांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे.

करप्शन की दुकान : भाजप

या आयकर छाप्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला असून, साहू यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी आणि साहू यांचे छायाचित्र ट्विट करीत 'करप्शन की दुकान' अशी टीका केली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, या छाप्यांवरून स्पष्ट होते की, काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था किती पोकळ करून टाकली होती. याप्रकरणी काँग्रेसला उत्तर द्यावेच लागेल, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news