PM Modi : जगात सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

PM Modi : जगात सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 टक्के पसंती मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. (PM Modi)

मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेच्या वतीने जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत नियमित सर्वेक्षण केले जाते. त्यात मोदी यांची लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवारी मॉर्निंग कन्सल्टने ताजे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार 76 टक्के पसंती मिळवत मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर 66 टक्के पसंतीसह मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ दुसर्‍या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे पंतप्रधान अ‍ॅलेन बर्सेट 58 टक्के पसंतीसह तिसर्‍या, ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनाशिओ लुला डिसिल्वा 49 टक्के पसंतीसह चौथ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेज 47 टक्के पसंतीसह पाचव्या स्थानी आहेत. (PM Modi)

मॉर्निंग कन्सल्टने म्हटले आहे की, 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात केलेल्या सर्वेक्षणातील हे निष्कर्ष आहेत. प्रत्येक देशातील निर्धारित व्यक्ती समूहाचे आठवडाभरात सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button