जालना : अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यावर तिर्थपुरी पोलिसांचा छापा | पुढारी

जालना : अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यावर तिर्थपुरी पोलिसांचा छापा

सुखापुरी; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील शेवता फाट्यावर असलेल्या पवनराजे ढाबा हॉटेलवर शनिवारी (दि. ९) रात्री तिर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने यांनी छापा मारला. यावेळी या ढाब्यावर अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेली देशी व विदेशी दारु बेकायदेशीररित्या ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे आढळून आले.

दरम्यान तिर्थपुरी पथकाने अधिक कारवाई केली असता, ऑफिसर्स चॉईस, मँगडॉल नंबर-१, रॉयल स्टॅग, इंपेरियल ब्ल्यू या विदेशी दारुसह भिंगरी दारूच्या बाटल्यांचा सुमारे 20 हजार 10 रुपयांचा साठा आढळून आला असून, तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि. साजीद अहमद यांच्या फिर्यादीवरून विशाल श्रीराम लिंगसे (रा. लिंगसेवाडी, ता. घनसावंगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सपोनि. साजीद अहेमद,सतिष दिंडे ,पोलीस अंमलदार महेश तोटे, नारायण माळी, विजय पवार आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Back to top button