पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोकण वगळता राज्यातून पाऊस पूर्णपणे थांबला असून आता राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण तयार झाल्याने 11 डिसेंबरपासून हिमालयात पश्चिमी चक्रवात तीव्र होत असल्याने राज्यातही बहुतांश भागात थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचाँग चक्रीवादळाने आठ दिवस राज्यातील वातावरण पावसाळी झाले होते. बहुतांश भागात दिवसभर गारे वारे सुटले होते.
मात्र शनिवारपासून हे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली असून कडक ऊन पडल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. कोकण वगळता उर्वरित राज्यातील वातावरण निरभ्र झाल्याने किमान तापमानात घट होण्यास 11 डिसेंबरपासून सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हिमालयात 11 डिसेंबरपासून नवी पश्चिमी चक्रवातच सक्रिय होत आहे. सध्या आकाश निरभ्र असल्याने ते वारे वेगाने राज्याकडे येऊन किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल. संपूर्ण मध्य भारतात या शीतलहरींचा परिणाम होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागातून पाऊस थांबला. मात्र 10 डिसेंबर रोजी कोकणात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर त्या भागातील पाऊसही थांबणार असल्याने आगामी आठवडा थंडीचा राहणार आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यातील वातावरण निरभ्र झाल्याने किमान तापमानात घट होण्यास 11 डिसेंबरपासून सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागातून पाऊस थांबला. मात्र 10 डिसेंबर रोजी कोकणात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर त्या भागातील पाऊसही थांबणार असल्याने आगामी आठवडा थंडीचा राहणार आहे.
राज्यातील पाऊस पूर्णपणे थांबला असून आगामी आठ दिवस कोठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही. तसेच थंडीला सुरुवात होऊन किमान तापमानात घट होईल. त्यामुळे पर्यटनासाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे.-अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा
हेही वाचा