paytm मालकांचे कधीकाळी लग्न जुळत नव्हत आणि आज अब्जावधीचा मालक !

paytm मालकांचे कधीकाळी लग्न जुळत नव्हत आणि आज अब्जावधीचा मालक !
Published on
Updated on

Paytm च्या 2.5 बिलियन डॉलर आयपीओ नंतर आता कंपनीच्या आजी आणि माजी कर्मचारी करोडपती होतील, असे सांगितले जात आहे. सुमारे 350 कर्मचाऱ्यांची एकूण संपत्ती किमान एक कोटी असेल. आज पेटीएम ही देशातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर जे 2017 मध्ये भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले होते. त्यांना सुरुवातीला महिन्याला फक्त 10 हजार रुपये मिळत होते. त्यामुळे त्यांचे लग्न देखील जमत नव्हते.

" २००४-०५ मध्ये माझ्या वडिलांनी मला ही कंपनी बंद करुन कोणतीही २०, ३० हजार रुपये पगाराची नोकरी करण्यास सांगितले होते. त्यावेळी माी एक छोटीशी कंपनी चालवत होतो. लग्नासाठी स्थळ यायची पण पुन्हा ते विचारत नव्हते. कारण त्या लोकांना माहित झालेलं असायच मी महिन्याला फक्त १० हजार मिळवातो. मला लग्नासाठी कोण योग्य मानत नव्हत"अस paytm चे विजय शेखर सांगतात.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये जन्म झालेल्या विजय शेखर यांचे वडील शिक्षक होते. आणि आई गृहिणी होत्या. आजही रस्त्याच्या कडेला हातगाडीवर खायला आणि चहा प्यायला आवडतं, असं विजय शेख यांनी सांगितलं होतं. 'बर्‍याच दिवसांपासून माझ्या आई-वडिलांना मुलगा काय करतोय हे कळत नव्हते.' असही त्यांनी सांगितलं आहे.

"एकदा माझी आई हिंदी वृत्तपत्र वाचत होती जेव्हा २०१५ मध्ये एका चीनी कंपनीने Paytm मध्ये गुंतवणूक केली होती. निव्वळ संपत्ती वाचून तिने मला विचारले, 'विजय हे लोक जितके सांगतात तितके पैसे तुझ्याकडे आहेत का?' असही त्यांनी सांगितलं.

विजय शर्मा यांचे शिक्षण हिंदी माध्यमात झाले आहे. नंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंग केले. जेव्हा त्यांनी पहिली कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना २४ टक्के व्याजाने कर्ज घ्यावे लागले. २०११ मध्ये, त्यांनी Paytm सुरू केले.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news