धक्कादायक! झाकीर नाईकवरची बंदी वाढली, तरीही होतोय गुगलवर सर्वाधिक सर्च | पुढारी

धक्कादायक! झाकीर नाईकवरची बंदी वाढली, तरीही होतोय गुगलवर सर्वाधिक सर्च

पुढारी ऑनलाईन : 17 नोव्हेंबर रोजी झाकीर नाईकच्या एनजीओवरील बंदी सरकारने 5 वर्षांसाठी वाढवली आहे. 2016 मध्ये, सरकारने नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) वर बंदी घातली. ही बंदी 5 वर्षे संपण्यापूर्वीच सरकारने पुन्हा वाढवली आहे. झाकीर नाईकवर आरोप आहे की, त्याच्या भाषणांमुळे देशातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. मात्र, भडकाऊ भाषणामुळे अनेक देशांमध्ये बंदी असतानाही झाकीर नाईकचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर आहेत. हे सर्व व्हिडिओ कायम सर्चमध्ये देखील असतात. गुगल ट्रेंड सर्चच्या निकालावरून असे दिसून येत आहे की, यूट्यूबवर झाकीर नाईकला सर्च करण्यात जम्मू-काश्मीरचे लोक आघाडीवर आहेत.

झाकीर नायक आता चर्चेत का आहे ? झाकीर नाईकबद्दल भारतात गुगल सर्चचा ट्रेंड काय आहे? सरकारने झाकीर नाईकच्या एनजीओवर २०१६ मध्ये बंदी का घातली? बंदी पुन्हा का वाढवली? आणि झाकीर नाईक सध्या कुठे आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

झाकीर नाईक सध्या चर्चेत का आहे?

17 नोव्हेंबर रोजी गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली आहे. 2016 मध्ये, सरकारने झाकीर नाईकच्या एनजीओवर 5 वर्षांसाठी बंदी घातली होती, जी 17 नोव्हेंबर रोजी संपणार होती. ज्या दिवशी बंदी संपेल त्याच दिवशी सरकारने बंदीचा कालावधी 5 वर्षांनी वाढवला आहे. म्हणजेच आता इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर 2026 पर्यंत बंदी घालण्यात येणार आहे.

झाकीर नाईकला गुगलवर कसे सर्च केलं जातंय?

गेल्या वर्षभरातील यूट्यूब सर्चच्या डेटावरून झाकीर नाईकला जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक सर्च केले जात असल्याचे दिसून येत आहे. झाकीर नाईक संदर्भात जास्त माहिती जम्मू काश्मीरमध्ये शोधली जाते. जम्मू-काश्मीरमधील सर्चची संख्या भारतातील सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. जम्मू-काश्मीरनंतर झाकीर नाईकला आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांतून यूट्यूबवर सर्वाधिक सर्च केले जात आहे. झाकीर नाईकला पंजाब, राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी सर्च केले गेले आहे.

Zakir Naki Search trends on YouTube
Zakir Naik Search trends on YouTube
Zakir Naik Search trends over time on yotube
Zakir Naik Search trends over time on yotube
बंदी आधी आणि नंतर सर्च ट्रेंड काय होता?

झाकीर नाईकवर 2016 मध्ये बंदी घालण्यात आली होती, तेव्हाच त्याला गुगलवर अधिक सर्च केले जात होते. 2016 मध्ये जुलै महिन्यात झाकीर नाईकच्या नावाने सर्वाधिक सर्च झाले. 1 जुलै रोजी ढाका येथे स्फोट झाला, ज्यामध्ये पकडलेल्या एका दहशतवाद्याने झाकीर नाईकच्या वक्तव्याने प्रभावित होऊन हा हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतरच भारत सरकारने या प्रकरणी कारवाई केली आणि झाकीर नाईकच्या एनजीओवर बंदी घालण्यात आली.

Zakir Naik Web search trend
Zakir Naik Web search trend
Zakir Naik Web search trend over a time
Zakir Naik Web search trend over a time

मात्र, 2016 मध्येच झाकीर नाईकच्या शोधात काही प्रमाणात घट झाली होती. झाकीर नाईकचा शोध 2016 पूर्वी आणि नंतरही सुरूच होता. ऑगस्ट 2020 नंतर झाकीर नाईकबाबत गुगल सर्च कमी होऊ लागले.

हेही वाचा : 

Preity Zinta : वयाच्या ४६ व्या वर्षी प्रिती झिंटा बनली जुळ्या मुलांची आई

POCSO act : सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल

 

Back to top button