ते फक्‍त सनातन धर्माची बदनामी करतात : अनुराग ठाकूरांचा काँग्रेसवर हल्‍लाबोल | पुढारी

ते फक्‍त सनातन धर्माची बदनामी करतात : अनुराग ठाकूरांचा काँग्रेसवर हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘त्यांची विचारसरणी स्पष्ट आहे. त्यांना देशाची संस्कृती आणि अस्मिता नष्ट करायची आहे. तुकडे तुकडे टोळीसोबत काही लोक उभे आहेत. मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही. त्यांची विचारसरणी केवळ हिंदुत्व आणि सनातन धर्माचा अवमान करणारी आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सनातन धर्माची बदनामी करत आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये केद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्‍लाबोल केला.

यावेळी अनुराग ठाकूर म्‍हणाले की, “तेलंगणाच्‍या भावी मुख्यमंत्र्यांनी (रेवंत रेड्‍डी) एक निवेदन जारी केले होते. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं होतं की, तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा चांगला आहे. सनातन धर्म, हिंदू आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध द्रमुक नेत्यांचे षड्यंत्र रचले जात आहे.”

पराभव झाला की ते ‘ईव्‍हीएम’ला दोष देतात

‘दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक विरोधी नेते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही. पराभवानंतर तो आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही. ते फक्त ईव्हीएमला दोष देतात, असा टोलाही अनुराग ठाकूर यांनी लगावला. नुकताच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगडमध्‍ये भाजपने घवघवीत यश मिळवले. तर तेलंगणामध्ये काँग्रेस आणि मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाने बाजी मारली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button