Weather forecast : पुढील ४८ तास राज्यातील ‘या’ भागांत पाऊस; IMD ची माहिती

Rainfall Forecast
Rainfall Forecast
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील ४८ तास राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील ट्विट आयएमडी पुणेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी केले आहे. डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्रात मुसळधारेची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात आज ऑरेंज अलर्ट असून, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather forecast)

Weather forecast : आणखी दोन दिवस पाऊस, त्यानंतर धुक्याची चाहूल

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळीने थैमान घातले आहे. मध्य महाराष्ट्रासह, उत्तर महराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, काही भागात गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आणखी दोन दिवस पावसाचे असून, त्यानंतर धुक्यांची निर्मिती होईल आणि थंडीची चाहूल लागेल, असे हवामान विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. (Weather forecast)

पुढील २ दिवसात तापमानात घट

हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, आज मंगळवारी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील आज आणि पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वायव्य आणि मध्य भारतातील तापमान किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. दरम्यान पुढील दोन दिवसानंतर सकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाची धुके पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather forecast)

दोन दिवसानंतर 'या' राज्यात थंडीची चाहूल

पुढील दोन दिवसानंतर उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान तर ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात मध्यम स्वरूपाच्या धुक्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्या 'या' राज्यात दाट धुके

पुढील दोन दिवस पावसाचे झाल्यानंतर देशातील वायव्येसह उत्तर भारतात थंडीची चाहूल लागेल, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. दिल्लीसह पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यात उद्या (दि.२७) सकाळच्या दरम्यान दाट धुक्याची शक्यता आहे, असेदेखील भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news