Bill Nelson : नासाचे प्रमुख बिल नेल्सन आज भारत भेटीवर; ‘निसार’ संयुक्त उपग्रह मोहीमेवर होणार चर्चा | पुढारी

Bill Nelson : नासाचे प्रमुख बिल नेल्सन आज भारत भेटीवर; 'निसार' संयुक्त उपग्रह मोहीमेवर होणार चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचा भारत आणि यूएई दौरा आजपासून सुरू होत आहे. ते भारतातील विविध सरकारी संस्थांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. नासा आणि इस्रो’च्या ‘निसार’ या संयुक्त उपग्रह मोहीमेवर महत्वाची चर्चा होणार आहे.

नासाने सांगितले की, अंतराळातील मानवी मोहिमा आणि पृथ्वी विज्ञानाशी संबंधित क्षेत्रांवरही यावेळी चर्चा होणार आहे. उभय देशांमधील उदयोन्मुख आणि प्रमुख तंत्रज्ञानाबाबत सहकार्याच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून हा दौरा असणार आहे.

नेल्सन बेंगळुरूमधील निसार (NISAR) मिशन चाचणी स्थळाला भेट देतील. हे मिशन २०२४ मध्ये प्रक्षेपीत केले जाईल. NISAR म्हणजेच नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार ही या दोन्ही देशांमधील पहिली उपग्रह मोहीम आहे, जी पृथ्वीचे बदलते हवामान, पृष्ठभाग, बर्फाच्छादित क्षेत्रे, जंगले, नैसर्गिक आपत्तींपासून ते समुद्राची वाढती पातळी आणि भूजल पातळी कमी होण्यापर्यंतची माहिती प्रदान करेल. या माध्यमातून हवामान बदलाचे धोके कमी करून शेतीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button