Winter Session 2023 | लोकसभेतून आणखी ३ विरोधी खासदार निलंबित, निलंबित खासदारांची संख्या १४६ वर | पुढारी

Winter Session 2023 | लोकसभेतून आणखी ३ विरोधी खासदार निलंबित, निलंबित खासदारांची संख्या १४६ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस खासदार दीपक बैज, नकुल नाथ, डीके सुरेश यांना गुरुवारी (दि.२१) लोकसभेतून निलंबित करण्यात आल्याने संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. ( Winter Session 2023)

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि १३ डिसेंबरच्या संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करताना घोषणाबाजी केल्याबद्दल एकूण १४० हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ( Winter Session 2023)

 Winter Session 2023 : खासदार निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचा मोर्चा

दरम्यान, गुरुवारी (दि.२१) इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेपासून दिल्लीतील विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. विरोधी खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात सुरक्षा भंग मुद्द्यावर न बोलून संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली. ( Winter Session 2023)

हेही वाचा:

Back to top button