PM मोदींवर टीका करताना राहुल गांधींची जीभ घसरली, “टीम इंडिया जिंकली असती…”

PM मोदींवर टीका करताना राहुल गांधींची जीभ घसरली, “टीम इंडिया जिंकली असती…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्‍यात भाजप आणि काँग्रेसमधील सामना आता अधिक रंगला आहे. आज (दि.२१) राजस्‍थानमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍यावर टीका करताना काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांची जीभ घसरली.

राजस्थानच्या जालोर येथे जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या घणाघाती टीका केली. ते म्‍हणाले की, क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धा जिंकत होती, पण या अपशकूना (पनौती)मुळे त्‍यांना हरवले. राहुल गांधी यांच्‍या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने आपला अधिकृत सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X वर याच शब्‍दांचा वापर करुन पोस्‍ट केली आहे. ओबीसींची संख्या जास्त आहे; पण केंद्र सरकारला त्यांच्या विकासाची काळजी नाही, असा आरोपही त्‍यांनी केला आहे.

आज काँग्रेसने राजस्‍थान विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास राज्याने जनतेसाठी सात शपथा जाहीर केल्या आहेत. जाहीरनाम्यात पंचायत स्तरावर भरती आणि जात जनगणनेसाठी नवीन योजनेचे आश्वासन देण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news