“आम्‍ही फक्‍त एकत्र दिसत नाही…” : राजस्‍थान काँग्रेसवर राहुल गांधींचे सूचक विधान

राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )
राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला असतानाच काँग्रेसमधील सचिन पायलट ( Sachin Pilot ) विरुद्ध अशोक गेहलोत ( Ashok Gehlot ) यांच्‍यातील राजकीय संघर्षावरही चर्चा रंगत आली आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी स्‍वत:च राजस्‍थान काँग्रेसमधील एकजुटीवर भाष्‍य केले आहे.

राहुल गांधी सध्‍या राजस्‍थानमधील प्रचारात व्‍यस्‍त आहेत. चुरूमधील तारा नगर येथील सभेला जाण्‍यापूर्वी राहुल गांधी यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांच्‍यासोबत राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष गोविंद सिंग दोतसरा उपस्‍थित होते.

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, आम्ही एक आहोत. पक्ष एकजूट आहे. आम्ही फक्त एकत्र दिसत नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. राजस्‍थानमध्‍ये पुन्‍हा एकदा काँग्रेसचा विजय होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. गहलोत आणि पायलट यांच्‍यात मतभेदाच्‍या चर्चेवर राहुल गांधी यांच्‍या विधानाला महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे.

२०२० मध्‍ये सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्‍याविरोधात बंडाचा झेंडा हाती होता. पायलट समर्थक १८ काँग्रेस आमदारांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर पायलट यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर दोन्ही नेत्यांमधील संबंध ताणले गेले. यानंतर पायलट यांनी गहलोत सरकारविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केले होते. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या मागील सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news