

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या ( Rajasthan Assembly poll ) तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यात आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र निवडणूक निकाल पूर्वीच्या नियोजनानुसार अन्य चार राज्यांमधील विधानसभा निकाला दिवशी म्हणजे ३ डिसेंबरलाच लागणार आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निवडणुकीची तारीख बदलण्याचे आवाहन केले होते. देवूठाणी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. राजस्थानमध्ये कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व मानले जाते. राज्यात या दिवशी शुभ कार्ये आणि मोठ्या प्रमाणात विवाह कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हे पाहता आयोगाने आता मतदानाची तारीख बदलून शनिवार २५ नोव्हेंबर केली आहे. ( Rajasthan Assembly poll )
नव्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी ७ नोव्हेंबरला होणार आहे. 9 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याच वेळी, पूर्वीप्रमाणेच, निकाल 3 डिसेंबरला लागतील.
20 जानेवारीपूर्वी नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक
राजस्थानमधील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपत आहे. त्याआधी नवे सरकार स्थापन करून विधानसभेचे अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे. त्याचवेळी ३ डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. अशा स्थितीत जानेवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात नवीन राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येऊ शकतो.
हेही वाचा :