N. Chandrababu Naidu: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा; कौशल्य विकास प्रकरणात जामीन मंजूर | पुढारी

N. Chandrababu Naidu: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा; कौशल्य विकास प्रकरणात जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नायडू यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांना २८ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली होती. (N. Chandrababu Naidu)

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे बुधवारी, २९ नोव्हेंबरपासून सार्वजनिक रॅली, सभा आयोजन करू शकतात. तसेच ते यामध्ये सहभागी देखील होऊ शकतात, असे देखील आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (N. Chandrababu Naidu)

N. Chandrababu Naidu: काय होते ‘कौशल्य विकास महामंडळ घोटाळा’

आंध्र प्रदेशमध्‍ये २०१४ मध्‍ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्‍यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ (APSSDC) स्‍थापन करण्‍यात आले होते. तत्‍कालिन मुख्‍यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्‍या सरकारने हा निर्णय घेतला होता. या महामंडळातमध्‍ये ३७१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्‍याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्‍यावर हे. त्‍यांच्‍याविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आदी गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होता. आंध्र प्रदेश सीआयडीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदान्‍वये गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हे न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र आज (दि.२०)  आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (N. Chandrababu Naidu)

हेही वाचा:

Back to top button