Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना न्यायालयाचा झटका; भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना न्यायालयाचा झटका; भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दाखल केलेल्या तीन याचिका आज (दि.९) आंध्र प्रदेश उच्‍च  न्यायालयाने फेटाळल्या.  (Chandrababu Naidu) माजी मुख्यमंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी इनर रिंग रोड, फायबर नेट, अंगल्लू-३०७ या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नायडू यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे, अशी माहिती त्यांचे वकील कृष्णा मूर्ती यांनी माध्यमांशी बाेलताना दिली. (Chandrababu Naidu)

N. Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत वाढ

विजयवाडा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) न्यायालयाने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी ‘एसीबी’ न्यायालयाने तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.

तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांनी आरोप फेटाळले

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख यांना गेल्या महिन्यात गुन्हेगारी अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोट्यवधी रुपयांच्या कथित कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. ज्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. परंतु, अनेक तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांना चंद्राबाबूंवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते.

हेही वाचा:

Back to top button