

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडलेल्या बायकोचे सार्वजनिकरीत्या कुंकू पुसून तिला 'घटस्फोट' दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, आणि या व्हिडिओतील जोडपे कोण आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. (wife caught with boyfriend)
'एक्स'वर ShoneeKapoor या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडलेल्या बायकोचे कुंकू पुसून आणि मंगळसूत्र काढून तिला नवऱ्याने मुक्त केले असे त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओत नवरा बाटलीतून पाणी ओतून बायकोच्या कपळावरील कुंकू पुसताना दिसतो, तसेच यानंतर तो बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकताना दिसतो.
हा व्हिडिओ शनिवारी दुपारपर्यंत १३०० लोकांनी शेअर केला होता, तर पाच लाखाच्यावर व्ह्यूज मिळालेले आहेत. या व्हिडिओवर बऱ्याच उलटसूलट प्रतिक्रिया येत आहेत.
NCMIndia Council For Men Affairs या यूजरने याला सामाजिक घटस्फोट म्हणायचा का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. "हिंदू विवाह मंदिरात लग्न केल्यानंतर आणि सिंदूरदान केल्याने ग्राह्य मानला जातो. फक्त न्यायालयांनाच घटस्फोट देण्याचा अधिकार का असला पाहिजे," असे या युजरने म्हटले आहे.
तर समिप अग्रवाल या युजरने कायदेशीर घटस्फोट घ्यावा लागेल असे म्हटले आहे.
तर CkHumanity या युजरने भारतात विवाहबाह्य संबंधांवर कायदेशीर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा