Bride crisis | आम्ही शेतकरी पोरं, ठेवू राणी सारखी तुला! कर्नाटकातील लग्नाळूंची पदयात्रा | पुढारी

Bride crisis | आम्ही शेतकरी पोरं, ठेवू राणी सारखी तुला! कर्नाटकातील लग्नाळूंची पदयात्रा

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी कोण देईना झाले आहे. यामुळे त्रस्त असलेले शेतकरी तरुण आता पुढच्या महिन्यात मंड्यातील एका मंदिरापर्यंत पदयात्रा (मार्च) काढण्याची योजना आखत आहेत. या पदयात्रेदरम्यान ते मंदिरात जाऊन त्यांची लग्नं जुळावीत यासाठी साकडे घालणार आहोत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये शेकडो लग्नाळू तरुणांनी अशीच पदयात्रा काढली होता. आता आणखी एक गट असाच प्रयत्न करणार आहे. अनेक मुली आणि त्यांच्या कुटुंबांना ग्रामीण भागातील स्थळ नको आहे. त्यांना शेतकरी नवराच नको. त्यामुळे मुलगी मिळत नसल्याने त्यांचे लग्नाचे वय उलटून जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Bride crisis)

संबंधित बातम्या 

संतोष नावाच्या एका शेतकऱ्याने म्हटले आहे की त्याचे वय ३० वर्ष उलटून गेले आहे. मुलगी मिळत नाही. यामुळे त्याच्यासारख्या शेकडो लग्नाळू तरुणांनी फेब्रुवारीमध्ये चामराजनगर जिल्ह्यातील एमएम हिल्स मंदिरापर्यंत पदयात्रा काढली होती. “आम्ही लग्नासाठी हुंडा मागत नाही. आम्ही त्यांची (संभाव्य नववधू) राणी प्रमाणे काळजी घेऊ. पण तरीही एकही कुटुंब त्यांच्या मुली आम्हाला द्यायला तयार नाहीत. समाजात या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढली,” असे संतोष याने सांगितले.

आम्ही नोकरदारांपेक्षा अधिक कमवतो. पण आम्ही केवळ शेतकरी असल्याने आम्हाला कोणीही मुलगी देण्यास तयार होत नाही. ही समस्या केवळ कर्नाटकात नाही. तर महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील शेतकरी मुलांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे संतोष सांगतो.

पुढील डिसेंबर महिन्यात मंड्या बॅचलर्स अखिल कर्नाटक ब्रह्मचारीगला संघाच्या बॅनरखाली आदिचुंचनगिरी मठावर जाण्याची योजना आखत आहेत. “आम्ही आदिचुंचनगिरीचे मठाधीश निर्मलानंदनाथ स्वामींना भेटलो आणि त्यांनी पदयात्रेला संमती दिली आहे. लग्नासाठी मुलगी न मिळणे ही मोठी समस्या असून याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे,” असे संघाचे संस्थापक केएम शिवप्रसाद यांनी सांगितले. (Bride crisis)

हे ही वाचा :

Back to top button