Bjp Vs Congress: राजस्थानातील बलात्कार प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला घेरले | पुढारी

Bjp Vs Congress: राजस्थानातील बलात्कार प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला घेरले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राजस्थानातील दौसा जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकानेच अल्पवयीन चिमुरडीवर केलेल्या बलात्कार प्रकरणावरून भाजपने काँग्रेस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच या मुद्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर तोफ डागली आहे. (Bjp Vs Congress)

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील लालसोट भागात एका पोलीस उपनिरीक्षकावर काल दुपारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित मुलगी सुमारे चार-पाच वर्षांची आहे. आरोपीने चिमुरडीला आमिष दाखवून आपल्या रुममध्‍ये नेले आणि तेथेच हे घृणास्पद कृत्य घडले. सहाय्यक पोलिस अधीक्षक रामचंद्र सिंह नेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस  उपनिरीक्षक सध्या कोठडीत असून, त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच व्यापक जनक्षोभ निर्माण झाला. स्थानिकांनी राहुवास पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या विरोधात केली.
(Bjp Vs Congress)

दिल्ली येथील भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे की अल्पवयीन पिडित मुलीचे वडिल तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. या गुन्ह्यात इतर दोन पेलिसांनी पुरावे नष्ट करण्यात मदत केली असल्याचे सांगत गेहलोत सरकार आरोपींना शिक्षा करण्याऐवजी वाचवत असल्याचे म्हटले आहे. राजस्थान सरकारने बलात्काऱ्यांना मोकळे रान दिले आणि काँग्रेसने बलात्काराला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना तिकीट दिल्याचा आरोप पूनावाला यांनी केला आहे. (Bjp Vs Congress)

राजस्थानात महिला अत्याचाराच्या दिवसाला तब्बल १८-२० घटना घडल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.  पण प्रियांका गांधी राजस्थान बलात्काराच्या घटनांवर गप्प बसतात. भारतात महिलांवरील सर्व गुन्ह्यांपैकी एकट्या राजस्थानमध्ये २२ टक्के गुन्हे घडले. यांचे नेते ‘मर्दो का प्रदेश’ म्हणून बलात्काराला प्रोत्साहन देतात  असे  असून सुध्दा काँग्रेस चकार शब्द काढत नाही. राजस्थानात दलित, आदिवासी महिलांवर अत्याचार होत मात्र त्यासाठी राहुल गांधी कोणतीही यात्रा काढणार नसल्याचे पूनावाला यांनी म्हटले. (Bjp Vs Congress)

हेही वाचा:

Back to top button