मोठी बातमी : उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा; लवकरच विशेष अधिवेशन | uniform civil code | पुढारी

मोठी बातमी : उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा; लवकरच विशेष अधिवेशन | uniform civil code

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये पुढील आठवड्यात समान नागरी कायदा लागू केला जाणार आहे. दिवाळीनंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले जाणार आहे, त्यामध्ये हे विधेयक मंजुर मांडले जाणार आहे.  (uniform civil code)

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी विचारविमर्ष करण्यासाठी समिती स्थानप करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती काम करत होती. ही समिती येत्या एकदोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायद्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.  (uniform civil code)

देसाई म्हणाल्या, “समितीने समान नागरी संहितेचा मसुदा बनवला आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे. हा मसुदा लवकरच सरकारला सादर केला जाईल.” उत्तराखंडनंतर गुजरातही समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button