Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ वाढ; ऑटो, आयटी घसरले, बँक, मेटल चमकले

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ वाढ; ऑटो, आयटी घसरले, बँक, मेटल चमकले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी (दि.१०) शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स ७२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६४,९०४ वर बंद झाला. तर निफ्टी ३० अंकांनी वाढून १९,४२५ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सुमारे १,६१५ शेअर्स वाढले, तर १,५५२ शेअर्स घसरले आणि १२८ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. ऑटो, आयटी, ऑईल आणि गॅस सेक्टरमध्ये विक्री दिसून आली, तर मेटल, कॅपिटल गुड्स आणि पॉवरमध्ये खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर (Sensex Today) एम अँड एम, टायटन, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले. तर एनटीपीसी, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, एचसीएल टेक, टायटन हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर एनटीपीसी, ओएनजीसी, टेक महिंद्रा, टाटा कन्झूमर हे टॉप गेनर्स राहिले.

हिंदाल्कोचे शेअर्स घसरले

हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेअरची (Hindalco Industries Share Price) किंमत ०.६५ टक्क्यांनी घसरून ४८१.३० रुपयांवर आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा महसूल ५६,१७६ कोटींच्या तुलनेत ३.६ टक्क्यांनी कमी होऊन ५४,१६९ कोटी रुपये जमा झाला. तर नफा २,१९६ कोटी रुपये नोंदवला आहे. नफ्यातही घट दिसून आली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर आणखी वाढणार असल्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. स्टॉक आणि बॉण्ड्समध्ये वाढ होऊन गुंतवणूकदार डॉलरकडे वळू शकतात. यामुळे भारतीय रुपया निचांकी पातळीवर आला आहे. आशियाई चलनेही आज कमकुवत दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य आज ८३.३०५० वर गेले. त्यानंतर रुपया ८३.३४ च्या पातळीवर बंद झाला. रुपयाची याआधीची निचांकी पातळी ८३.२९५० होती. गुरुवारी रुपया ८३.२८०० वर बंद झाला होता.

यूएस बॉण्डच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. कारण २ वर्षांचे उत्पन्न ५.०४ टक्क्यांनी वाढले आहे आणि डॉलर निर्देशांक सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत १०६ वर होता.

जागतिक बाजारातून कमकुवत संकेत

दरम्यान, अमेरिकेतील बाजारात गुरुवारी तेजीला ब्रेक लागला होता. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज, नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) निर्देशांक घसरून बंद झाले. त्यानंतर आशियाई बाजारातही कमजोर स्थिती दिसून आली. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक (Hang Seng Index) घसरून बंद झाला. हँगसेंग निर्देशांक १.७६ टक्के म्हणजेच ३०८ अंकांनी घसरून १७,२०३.२६ वर आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news