Telangana Elections : काँग्रेसने तेलंगणामधील उमेदवार बदलले | पुढारी

Telangana Elections : काँग्रेसने तेलंगणामधील उमेदवार बदलले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने तेलंगणा विधानसभेत एक उमेदवार बदलला आहे. डॉ. पटलोला संजीव रेड्डी यांना नारायणखेड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी नारायणखेड मतदारसंघातून सुरेश कुमार शेटकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती.

यापूर्वीही जारी केलेल्या यादीत काँग्रेसने एक उमेदवार बदलला होता. पाटणचेरु मतदारसंघातून कट्टा श्रीनिवास गौड यांना उमेदवारी दिली आहे. आधी नीलम मधू मुदिराज हे तिथले उमेदवार होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी देखील एक सुधारित यादी काँग्रेसने जाहीर केली होती, त्यात ४ उमेदवार बदलले होते. उमेदवार बदली प्रकरणामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याचे देखील बोलले गेले होते. नावे बदलल्याच्या मुद्द्यावरून भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीकाही करण्यात आली होती.

हेही वाचा :

Back to top button