हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांची २४.९५ कोटींची मालमत्ता जप्त | पुढारी

हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांची २४.९५ कोटींची मालमत्ता जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडीने मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात हीरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांची २४.९५ कोटींची दिल्लीतील स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. Pawan Munjal

हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांची २४.९५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. दिल्लीतील मुंजाल यांच्या तीन स्थावर मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत, असे अंमलबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे. Pawan Munjal

दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने ऑगस्टमध्ये पवन मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए खटला दाखल केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांच्यावर बेकायदेशीरपणे ५४ कोटी विदेशी चलन भारताबाहेर काढल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button