पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान आज गुरुवारी (९ नोव्हेंबर) भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी सपाट खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५७ अंकांनी घसरून ६४,९१८ वर होता. तर निफ्टी १९,४३१ वर व्यवहार करत आहे. एफएमसीजी, आयटी आणि बँकिंग सेक्टरमुळे बाजारावर दबाव राहिला आहे. तर मेटल, ऑटो आणि रियल्टी सेक्टरमधील खरेदीमुळे काही प्रमाणात सपोर्ट मिळत आहे. (Stock Market Updates)
संबंधित बातम्या
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, सन फार्मा, रिलायन्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले आहेत. तर एम अँड एम, एलटी, आयसीआयसीआय बँक, विप्रो, मारुती, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील हे शेअर्स वधारले आहेत.
निफ्टी ५० वर एम अँड एम, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल हे टॉप गेनर्स आहेत. तर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, टेक महिंद्रा, सन फार्मा, हिंदाल्को, एसबीआय लाईफ हे घसरले आहेत.
दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली आले आहे.
हे ही वाचा :