वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजारात पुनश्च ‘तेजी’ | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : शेअर बाजारात पुनश्च ‘तेजी’

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

मंदगतीने का होईना पण क्रूड ऑईल दर खाली येणे, भारतातील बहुतेक कंपन्यांचे दुसर्‍या तिमाहीचे उत्तम आर्थिक निकाल आणि यांच्या बरोबरच फेडरल रिझर्व्हने व्याज दरवाढ न करणे, या तिन्ही सकारात्मक बातम्यांच्या पाठबळावर मरगळलेल्या शेअर बाजाराने कात टाकली नाही तरच नवल!

निफ्टी 50 आणि सेन्सेक्स सव्वा टक्क्यांनी तर निफ्टी बँक जवळपास दोन टक्क्यांनी सप्ताहात वधारले. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स तर अनुक्रमे 3.86 टक्के आणि 4.64 टक्के वाढले. परंतु ह्या आठवड्यात बाजारात खरा जल्लोष केला तो निफ्टी रिअ‍ॅल्टी इंडेक्सने ! साडेबारा टक्क्यांनी हा इंडेक्स वाढला. रिअ‍ॅल्टी इंडेक्समधील बहुतेक कंपन्यांचे शेअर्स 52 (Week High) च्या पातळीवर आहेत. त्यांची ह्या आठवड्यातील कामगिरी शेजारील चौकटीत पाहा.

मागील एका लेखात म्हटल्याप्रमाणे भारतातील वाढते शहरीकरण आणि त्यापुढे परवडणार्‍या घरांना वाढलेली मागणी (Affordable Housing)  हा रिअल इस्टेट सेक्टरच्या वाढीचा मुख्य घटक आहे. याच्या जोडीला कमर्शिअल प्रॉपर्टीज वेअरहाऊसेस, इंडस्ट्रीयल लँडस् ह्या सर्वच गोष्टींना प्रचंड महत्त्व आलेले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात वरीलपैकी काही शेअर्स (Heavy Weights) बनले तर आश्चर्य वाटायला नको.

गतसप्ताहात भारतामध्ये तीन प्रमुख घटना घडल्या. अ‍ॅपलच्या आयफोनची निर्मिती टाटा ग्रुप भारतामध्ये करणार असल्याची बातमी ही त्यापैकी एक (Tata Electronics Pvt. Ltd (TEPL)  ही टाटा ग्रुपची एक उपकंपनी आहे. (Precision Components) चे (manufacturing) ती करते. दूसरीकडे (Wisteron Corporation) ही तैवानस्थित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. (TEPL) ही तिची उपकंपनी आहे. TEPL ने ही (Wisteron Iufocomm)   कंपनी रु. 1000 कोटींना विकत घेतली. जिच्यामार्फत ती (I Phone) चे असेब्लिंग करेल.

रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांच्यात करार होऊन रिलायन्स एसबीआय कार्ड सुरू करण्याची घोषणा झाली. रिलायन्स रिटेलच्या सर्व आऊटलेटमधून ग्राहकांना ह्या कार्डअंतर्गत विविध ऑफससहीत खरेदी करतो येईल. फॅशन (&) लाईफस्टाईल, ग्रोसरी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, फर्निचर, ज्वेलरी आदी सर्व क्षेत्रांत रिलायन्स रिटेल प्रवेश करेल आणि त्याचा लाभ एसबीआय कार्डलाही होईल. स्वित्झर्लंडची झुरीच इन्शुरन्स ही कंपनी कोटक जनरल इन्शुरन्सचा 51 टक्के भागहिस्सा रु. 4000 कोटींना खरेदी करेल. इथून पुढील 3 वर्षात ती आणखी 19 टक्के भागहिस्सा खरेदी करेल. ह्या करारामुळे कोटक जनरल इन्शुरन्सवरील कोटक बँकेचे स्वामीत्व संपुष्टात येईल.

जागतिक आणि विशेषतः अमेरीकन बाजारांमध्ये सुधारणा असल्यामुळे भारतीय बाजारही पुढील सप्ताहात तेजीत राहील. श्रीराम फाइनान्स, वेलरजन,कॉर्प, ओबेरॉय रिअ‍ॅल्टी, केपीआयटी टेक, टायटन हे सर्व शेअर्स तेजी दाखवत आहेत. बाटा, मुथूट फाइनान्स हे शेअर्सही गती पकडतील. 19500 चा अडथळा निफ्टीने पार केला तर पुन्हा एकदा 20000 कडे निफ्टीचा प्रवास सुरू होईल. अन्यथा 19000 ते 19500 च्या दरम्यान काही काळ तो घुटमळेल. बँकनिफ्टीचाही 45000 च्या दिशेने प्रवास सुरू राहील.

Back to top button