UPI पेमेंटचा नवा विक्रम, पहिल्यांदाच १,१०० कोटींचा टप्पा ओलांडला | पुढारी

UPI पेमेंटचा नवा विक्रम, पहिल्यांदाच १,१०० कोटींचा टप्पा ओलांडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील डिजिटल पेमेंटने ऑक्टोबर महिन्यात त्याच्या वाढीचा वेग कायम ठेवला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांनी प्रथमच 1,100 कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे. UPI ने ऑक्टोबरमध्ये 1,141 कोटी पेक्षा जास्त व्यवहारांची नोंद केली. ज्याचे मूल्य 17.16 लाख कोटी आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे. (UPI Transactions)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये 8 टक्के वाढ होऊन 1,056 कोटी व्यवहारांची नोंद झाली. दरम्यान, या व्यवहारांचे मूल्य 8.6 टक्क्यांनी वाढून 15.8 लाख कोटींवर पोहोचले. वर्ष-दर वर्षीच्या आधारावर UPI ने ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूममध्ये 55 टक्क्यांनी वाढ नोंदवली. ऑक्टोबर 2023 मध्ये 11 अब्ज पेक्षा जास्त UPI व्यवहार झाले. दरम्यान, लोक मोबाईलच्या माध्यमातून UPI चा सर्वाधिक वापर करत आहेत, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने X वर (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे. (UPI Transactions)

UPI ने ऑगस्टमध्ये प्रथमच 1,000 कोटी व्यवहारांचा टप्पा गाठला आणि सप्टेंबरमध्ये गती कायम ठेवली. या वर्षी UPI मार्केटमध्ये सप्टेंबर महिन्यात PhonePe 7.7 लाख कोटी मूल्याच्या 497.2 कोटी व्यवहारांसह आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवले. तर Google Pay, Paytm आणि CRED हे UPI व्यवहारांच्या बाबतीत PhonePe च्या मागे आहेत. (UPI Transactions)

हेही वाचा:

Back to top button