

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 'ईडी'ने (सक्तवसुली संचनालय) नोटीस बजावली होती. आज (दि.२) चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. दरम्यान, आज 'ई़़डी'समोर हजर राहता येणार नाही, असे केजरीवाल यांनी कळवले आहे. (CM Arvind Kejriwal)
दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी ) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. आज (दि.२) त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी १६ एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण विभानाने (CBI) दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची नऊ तास चौकशी केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.
माध्यमांशी बोलत असताना केजरीवाल म्हणाले की, चार राज्यांच्या निवडणुकीत प्रचार करू नये म्हणून 'ई़़डी'ने नोटीस पाठवली आहे. आणि ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने पाठवली आहे. 'ईडी'ने ही बेकायदेशीर नोटीस तात्काळ पाठीमागे घ्यावी, अशी मागणी करत आ़ज ई़़डीसमोर हजर राहता येणार नाही. मी मध्य प्रदेशमध्ये प्रचारासाठी जाणार आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा