नारायण मूर्तींच्‍या सल्‍ल्‍या प्रमाणे ७० तास नाही; पण भारतीय खूप कष्‍टाळू : जाणून घ्‍या ILO डेटातील माहिती | पुढारी

नारायण मूर्तींच्‍या सल्‍ल्‍या प्रमाणे ७० तास नाही; पण भारतीय खूप कष्‍टाळू : जाणून घ्‍या ILO डेटातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताला प्रगती करायची असल्यास तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवे, असा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिली. त्‍यांच्‍या या सल्‍ल्‍यानंतर कामाचे तास किती असावेत, या चर्चेला उधाण आले आहे. मात्र भारतीय हे मुळातच प्रचंड कष्‍टाळू आहेत. मूर्ती सांगतात त्‍याप्रमाणे ७० तास नाही तरी भारतातील सरासरी कामाचा आठवडा हा सर्वात मोठा असल्‍याचे २०२३ मध्‍ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची (आयएलओ) (ILO data) आकडेवारी सांगते. जाणून घेवूया या आकडेवारीविषयी…

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने या वर्षी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात पूर्वीच पासून जगातील सर्वाधिक कामाचे तास असणार्‍या देशांपैकी एक आहे. भारतात दर आठवड्याला सरासरी ४७.७ तास काम केले जाते. जगातील 10 मोठ्या अर्थव्यवस्थांशी तुलना केल्यास भारतीयांचा सरासरी कामाचा आठवडा सर्वात मोठा आहे.केवळ कतार, काँगो, लेसोथो, भूतान, गांबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या सरासरीने भारत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.

काय म्‍हणाले होते नारायण मूर्ती ?

इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांच्यासोबत संवाद साधताना ते म्हणाले की, तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे. कठोर परिश्रमामुळे उत्पादकता वाढून देशाची प्रगती होईल. पाश्चात्त्य देशातील वाईट सवयीचे अनुकरण करण्याऐवजी कठोर मेहनत करण्याची सवय त्यांच्याकडून घेण्याची गरज आहे. चीनसह अन्य देशांकडे पाहिल्यास याची प्रचिती येईल. अन्य देशांनी २५ ते ३० वर्षांपूर्वीच चांगली धोरणे तयार केल्यामुळे त्या देशांची प्रगती झाली आहे. उत्पादन क्षमता वाढल्यास भारताची प्रगती होईल. त्यासाठी तरुणांनी योगदान द्यायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मूर्तींच्‍या मतांवर नेटिझन्‍सनी उठवली होती टीकेची झोड

नारायण मूर्ती यांच्‍या मतांवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली. JSW ग्रुपचे सीएमडी सज्जन जिंदाल, ओला कॅब्सचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल आणि पै यांसारख्या अनेक उद्योगपतींनी त्यांच्या मताचे समर्थन केले.

अधिक तास कामाचे समर्थन यापूर्वी बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शंतनू देशपांडे यांनी केले होते. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात 18-तास काम करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिा होता. त्याच्या लिंक्डइन पोस्टवरही प्रचंड टीका झाली होती. अखेर त्‍यांना दिलगिरी व्‍यक्‍त करायला लागली होती.

जगातील सर्वात मोठ्या १० अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे साप्ताहिक कामकाजाचे तास सर्वाधिक आहेत आणि दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सर्वात कमी आहे. याउलट जगातील सर्वात मोठ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये 30.1 तासांचा सर्वात कमी काम करणारा फ्रान्स या देशाचा दरडोई जीडीपी ५५,४९३ डॉलर इतका आहे.

हेही वाचा : 

Back to top button