Chandrayaan-3 : चंद्रावर असलेले विक्रम, प्रज्ञान जागे होणार; आणखी महत्त्वपूर्ण माहिती 'इस्रो'ला पाठवणार | पुढारी

Chandrayaan-3 : चंद्रावर असलेले विक्रम, प्रज्ञान जागे होणार; आणखी महत्त्वपूर्ण माहिती 'इस्रो'ला पाठवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निद्रितावस्थेत असलेले प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजितकुमार मोहंती यांनी बुधवारी दिली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) ‘चांद्रयान- ३’चे चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीरीत्या लँडिंग झाले आहे. रोहर आणि लँडरने यशस्वी कामगिरी करून चंद्रावरील वातावरण आणि खनिजाची माहिती ‘इस्रो’ला पाठविली आहे. सध्या विक्रम आणि प्रज्ञान स्लिप मोडमध्ये गेले आहेत. ते निद्रावस्थेत आहेत. ते पुन्हा कार्यान्वित होण्याबाबत ‘इस्रो’नेही साशंकता व्यक्त केली असताना अणुऊर्जा आयोगाने मात्र ते जागे होऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली आहे. ‘चांद्रयान-३’च्या प्रॉप्युलशन मॉड्युलमध्ये रेडिओआयसोटोपसारखी ऊर्जानिर्मिती करणारी दोन उपकरणे (हिटिंग युनिटस्) बसविण्यात आली आहेत. प्रॉप्युलशन मॉड्युलद्वारे ऊर्जा प्राप्त झाल्यास विक्रम आणि प्रज्ञान भविष्यात कार्यान्वित होऊन चंद्रावरील महत्त्वपूर्ण माहिती ‘इस्रो’ला पाठवतील, अशी शक्यता मोहंती यांनी वर्तविली.

संबंधित बातम्या : 

 

Back to top button