chandrayaan-3 : चंद्रावर अजूनही सक्रिय ‘चांद्रयान-3’चे एक उपकरण | पुढारी

chandrayaan-3 : चंद्रावर अजूनही सक्रिय ‘चांद्रयान-3’चे एक उपकरण

बंगळूर : भारताच्या ‘चांद्रयान-3’चे chandrayaan-3 लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानशी पुन्हा एकदा संपर्क स्थापन करण्यासाठी ‘इस्रो’चे संशोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यामध्ये त्यांना अद्याप यश आलेले नाही. अर्थात ही मोहीम चौदा दिवसांचीच होती व ती आधीच पूर्ण झालेली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय ‘चांद्रयान-3’ चे एक पेलोड असेही आहे, जे अद्याप चंद्रावर सक्रिय आहे. ते चंद्रावरून सातत्याने नवी नवी माहिती ‘इस्रो’च्या कमांड अँड कंट्रोल स्टेशनकडे पाठवत आहे. या पेलोडचे नाव आहे ‘स्पेक्ट्रो-पोलरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’.

हे चांद्रयान-3 chandrayaan-3 च्या प्रणोदन मॉड्यूलचा एक भाग आहे जे 52 दिवसांपासून चंद्राची परिक्रमा करीत आहे. आतापर्यंत त्याने पुरेसा डाटा पाठवला असून ते आणखी दीर्घकाळापर्यंत आपले काम सुरू ठेवू शकेल. चंद्राभोवती फिरत हे पेलोड पृथ्वीच्या ‘राहण्यास योग्य ग्रह’ या वैशिष्ट्याचेही अध्ययन करील. त्याच्या निरीक्षणातून मिळालेल्या डेटाचा वापर इस्रोच्या टीमला बाह्यग्रहांचा अभ्यास करण्यासाठी होईल.

आपल्या सौरमंडळाच्या बाहेरील व पृथ्वीसद़ृश अशा ग्रहांना पृथ्वीची कोणकोणती वैशिष्ट्ये लागू होतात हे पाहून संबंधित ग्रहावर जीवसृष्टीची किती शक्यता आहे हे पडताळून पाहिले जाऊ शकते. ‘इस्रो’च्या chandrayaan-3 अध्यक्षांनी म्हटले आहे की, हे पेलोड पृथ्वीपासूनची द़ृश्यता चांगली आहे तोपर्यंतच निश्चित काळासाठी संचालित करता येऊ शकेल. ज्यावेळी ते संचालित होत असते तेव्हा त्याच्यापासून सातत्याने डेटा मिळत असतो.

Back to top button