Maratha Reservation: दिल्लीत जंतरमंरवर मराठा आरक्षणासाठी मराठा- कुणबी शेतकरी संघटनेचे आंदोलन | पुढारी

Maratha Reservation: दिल्लीत जंतरमंरवर मराठा आरक्षणासाठी मराठा- कुणबी शेतकरी संघटनेचे आंदोलन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात आंदोलन पेटले असताना राष्ट्रीय जनहित मराठा कुणबी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत जंतरमंरवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मागणी आंदोलकांनी केली. Maratha Reservation

राष्ट्रीय जनहित मराठा कुणबी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंतरमतर यथे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन आजपासून सुरू केले. संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने काढलेल्या विनंती पत्रामध्ये मागणी करण्यात आली आहे, की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण कायदेशीररित्या मिळायला पाहिजे. केंद्र सरकारने मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण जाहीर करावे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धारही संघटनेने जाहीर केला आहे.  Maratha Reservation

गेल्या काही वर्षात राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाले, आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील ५५-६० तरूणांचा जीव गेला आहे. तरी देखील सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नसल्याने समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय जनहित मराठा कुणबी शेतकरी संघटना केंद्र सरकारपर्यंत समाजाचा आवाज पोहचविण्यासाठी आंदोलन करत असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button