७० तास काम करा म्हणणारे नारायण मूर्ती किती तास काम करतात? पत्नी सुधा मूर्तींनी केला खुलासा | Narayan Murthy

७० तास काम करा म्हणणारे नारायण मूर्ती किती तास काम करतात? पत्नी सुधा मूर्तींनी केला खुलासा | Narayan Murthy

 पुढारी ऑनलाईन डेस्क : Infosys चे संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी देशाची एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना "आठवड्यातून 70 तास" कामाचा फॉर्म्युला सांगितलेला होता. त्यांच्या या नव्या फॉर्मुल्याला अनेकांनी विरोध दर्शविला. सोशल मीडिया युजर्ससह अनेकांनी मूर्ती यांच्या या फॉर्म्युलावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. आता पत्नी सुधा मुर्ती यांनी नाराायण मुर्ती यांच्या कामांच्या तासाबाबत एक नवी माहिती दिली आहे. सुधा मुर्ती यांची ही माहिती नारायण मूर्ती यांच्या कामाच्या ७० तासांबाबतच्या फॉर्मुल्याशी संबंधित आहे.

नारायण मूर्ती यांची आठवड्यातून 70 तास काम करण्याची कल्पना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. वर्क-लाइफ बॅलन्सचा हवाला देत त्यांच्या विधानाला अनेकांनी विरोध दर्शविला. एका माध्यमाने नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आता नारायण मूर्ती किती काम करतात हा विषय चर्चेत आला आहे.

नारायण मूर्ती 80-90 तास काम करतात

सुधा मूर्ती म्हणाल्या, "ते (नारायण मूर्ती) आठवड्यातून 80 ते 90 तास काम करतात. त्यांनी कधीही त्यापेक्षा कमी काम केले नाही. त्यांचा  मेहनतीवर विश्वास आहे आणि त्यांनी त्याचं आयुष्य त्यांच्या नियमांनुसार घालवले आहे. "

नारायण मूर्ती यांनी दिलेला कामाच्या तासांचा फॉर्मुला

नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी 3one4 कॅपिटलच्या पॉडकास्टमध्ये भारताच्या कमी उत्पादकतेवर विधान केले होते. मूर्ती यांनी युवा श्रम या विषयावर भाष्य करताना म्हणाले की, देशाची उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे, जे त्यांच्या मते जगात सर्वात कमी आहे. चीनसारख्या देशाशी स्पर्धा करण्यासाठी तेथील तरुणांना दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीप्रमाणे अतिरिक्त तास काम करावे लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news