पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याला ७० तास काम करावे, असा सल्ला दिला होता. यावरून जोरदार वादंग निर्माण झाले आहे. एकीकडे नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याला विरोध होत असताना अनेक उद्योगपती तसेच तरुण त्यांचे समर्थनही करत आहेत. टेक महिंद्रा या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरुनानी यांनी नारायण मूर्ती यांचे समर्थन केलेले आहे. नारायण मूर्ती यांचे वक्तव्य कंपनीतील कामापुरते मर्यादित नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (Tech Mahindra CEO supports Narayan Murthy)
गुरनानी म्हणाले, "नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जेव्हा नारायण मूर्ती कामाबद्दल बोलतात, तेव्हा ते फक्त कंपनीतील कामाबद्दल बोलत नाहीत. ते तुम्हाला, देशाला लागू पडते." ही बातमी हिंदूस्थान टाइम्सने दिली आहे.
ते म्हणाले, "तुम्हा कंपनीत ७० तास काम करा, असे ते म्हणालेले नाहीत. ४० तास कंपनीसाठी द्या, तर आणखी ३० तास स्वतःच्या प्रगतीसाठी द्या. तुमचे दहा हजार तास स्वतःवर खर्च करा जेणे करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ व्हाल. रात्रीचा दिवस करा आणि तुमच्या क्षेत्रातील एक्सपर्ट व्हा."
इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनीसुद्ध नारायण मूर्ती यांचे समर्थन केले आहे. नारायण मूर्ती यांचा सल्ला हा तरुणांसाठी त्यातही ज्यांचे वय ३०च्या आत आहे, त्यांच्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा