

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमापोटी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आल्याचा दावा करणारी सीमा हैदर भारतीय सण उत्साहात साजरे करत आहे. आता सीमा हैदर पती सचिन मीना याच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत करणार आहे. या व्रतासाठी तिने माहेरून पूजा आणि उपवासाचे साहित्य मागवले आहे. सीमाने एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे, असे वृत्त आज तक ने दिले आहे. (Seema Haidar)
संबंधित बातम्या :
सनातन धर्माच्या प्रथेनुसार उपवास करणार असल्याचे सीमाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. करवा चौथसाठी वकील एपी सिंह यांच्या आईने लेहेंगा, पूजा साहित्य आणि इतर साहित्य पाठवले होते. करवा चौथचा उपवास मी सनातन धर्माच्या प्रथा आणि परंपरांवर आधारित ठेवणार आहे. मी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करेन, असे तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
सीमाने म्हटलं आहे की, संपूर्ण जगात भारतासारखा सुंदर देश दुसरा नाही. इथे प्रत्येक सण वेगळ्याच आनंदाने साजरा केला जातो. जो कुणालाही विसरणे सोपे नाही. व्हिडीओच्या शेवटी तिने हिंदुस्थान झिंदाबाद अशी घोषणाही दिली.
हेही वाचा :