Seema Haider : ‘कराची टू नोएडा’ सीमा हैदरच्या चित्रपटाचे थीम सॉन्ग Chal Pade Hain Hum रिलीज | पुढारी

Seema Haider : 'कराची टू नोएडा' सीमा हैदरच्या चित्रपटाचे थीम सॉन्ग Chal Pade Hain Hum रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमा हैदरच्या आयुष्यावर आधारित कहाणी कराची टू नोएडा चित्रपटाचे थीम सॉन्ग रिलीज झाले आहे. Chal Pade Hain Hum असे गाण्याचे नाव आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला जुलै २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून (Seema Haider) बेकायदेशीरपणे भारतात आली होती. ती तिचा प्रियकर सचिन मीनासाठी भारतात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर मिळाली होती . (Seema Haider)

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सीमा हैदर आपल्या चार मुलांसहित नेपाळच्या मार्गाने बसमधून भारताची सीमा ओलांडून आली होती. तिचा प्रियकर सचिन मीना ग्रेटर नोएडातील राबपुरा जिल्ह्यात राहतो. त्याच्यासाठी तिने भारतात आल्याचे सांगितले. आता बॉलिवूडमध्ये अमित जैनने कराची टू नोएटा या टायटल खाली चित्रपट आणला आहे. या चित्रपटातील २० ऑगस्ट रोजी चल पडे है हम हे हे गाणे रिलीज झाले आहे. गाणे प्रीती रोज आणि निर्माता अमित जैन यांनी कम्पोज केलं आहे. फरहीन फलक हिने सीमा हैदरची व्यक्तीरेखा साकारलीय.

Back to top button