जसा देश, तशी देशभक्‍ती… अंजूनं साजरा केला १४ ऑगस्‍ट तर सीमा हैदरनं फडकवला तिरंगा | पुढारी

जसा देश, तशी देशभक्‍ती... अंजूनं साजरा केला १४ ऑगस्‍ट तर सीमा हैदरनं फडकवला तिरंगा

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : भारतातून पाकिस्‍तानला गेलेली अंजूने तिथे गेल्‍यावर यौम-ए-आजादी (स्‍वतंत्रता दिवस) साजरा केला. तर सीमा हैदरने नोएडामध्ये हिंदुस्‍थानचा झेंडा फडाकावला. तीने हिंदुस्‍थान झिंदाबाद आणि पाकिस्‍तान मुर्दाबादचे नारे लावले. पाकिस्‍तान १४ ऑगस्‍टला त्‍यांचा स्‍वतंत्रता दिवस साजरा करतो. तर भारत हा १५ ऑगस्‍ट या दिवशी आपला स्‍वतंत्रता दिवस साजरा करतो.

सीमा हैदर आणि अंजू… ही दोन नावे सध्या भारत आणि पाकिस्‍तानमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. जिथे अंजू आपल्‍या प्रेमीसाठी भारतातून पाकिस्‍तानला गेली. तर दुसरीकडे सीमा हैदरही देखील आपल्‍या खऱ्या प्रेमापोटी पाकिस्‍तानातून पळून भारतात आली. या गोष्‍टी दोघींबाबतीत कॉमन होत्‍या. या दरम्‍यान बातमी आली आहे की, अंजू ने पाकिस्‍तानचा स्‍वतंत्रता दिवस साजरा केला. तर सीमाने देखील भारतात भारताचा झेंडा फडावला आणि हिंदूस्‍थान झिंदाबादच्या घोषणा दिल्‍या. एका न्यूज एजन्सीने दिलेल्‍या माहितीनुसार, पाकिस्‍तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचलेल्‍या अंजूने तिथे पाकिस्‍तानच्या समारंभात सहभागी झाली. अंजूने तिथे नसरूल्‍लाहच्या सोबत पाकिस्‍तानच्या यौम-ए-आजादी चा केकही कापला.

दुसरीकडे आपल्‍या देशात आलेल्‍या सीमा हैदरने सचिन सोबत नोएडाच्या रबुपुरात आपल्‍या घरात रविवारी तिरंग्या सारखी साडी, माथ्‍यावर जय माता दी लिहिलेली चुनरी आणि तिरंगा फडकावला. यावेळी तिच्यासोबत सगळी मुले, सचिन, सचिनचे वडील नेत्रपाल आणि वकील एपी सिंह हे देखील उपस्‍थित होते. सीमा आणि तीच्या मुलांनी देखील हिदुस्‍थान झिंदाबादच्या घोषणा दिल्‍या. यावेळी त्‍यांनी पाकिस्‍तान विरोधी घोषणाही दिल्‍या.

सीमा हैदर म्‍हणाली आज मी घरावर तिरंगा फडकावला आहे आणि आता मी हिदुस्‍थानचीच आहे. पुढे ती म्‍हणाली जर संधी मिळाली तर मी गदर-२ चित्रपट पाहायलाही जाईन.

हेही वाचा :

Independence Day : परदेशातही स्वातंत्र्यदिनाची क्रेझ; ब्रिटीशांच्या राजधानीत भारतीयांनी फडकावला तिरंगा

Chandrayaan-3: चांद्रयान-३ आता चंद्रापासून काही पावले दूर, चाैथ्‍या टप्प्‍यात यशस्‍वी प्रवेश
Uttarakhand rain | उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार, पत्त्याच्या बंगल्यासारखी कॉलेजची इमारत कोसळली (व्हिडिओ)

Back to top button