पती-पत्नी विभक्त झाल्यास मुलांचा ताबा पत्नीला मिळायला हवा : मद्रास हायकोर्ट | पुढारी

पती-पत्नी विभक्त झाल्यास मुलांचा ताबा पत्नीला मिळायला हवा : मद्रास हायकोर्ट

चेन्नई; वृत्तसंस्था : दहा वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलांची योग्य काळजी केवळ आईच घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नी एकमेकांपासून विभक्त झाल्यास अशा मुलांचा ताबा पत्नी म्हणजे आईला मिळायला हवा, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास हायकोर्टान दिला आहे.

संबंधित बातम्या : 

न्यायमूर्ती आर. सुब्रमण्यम आणि डी. नागार्जुन यांच्या खंडपीठाने आठ वर्षांच्या मुलीच्या ताब्या संबंधित प्रकरणावर निकाल दिला की, वडील वर्षभरापासून आपल्या मुलीशिवाय अमेरिकेत आनंदाने राहत आहेत. त्यांनी मुलीला वृद्ध आई-वडिलांकडे मुंबईत सोडले होते. चार आठवड्यांत मुलाचा ताबा आईकडे देण्याचे आदेश न्यायालयाने वडिलांना दिले आहेत. स्टॅलिन सॅम्युअल आणि ग्रेसी सिल्व्हिया यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर दोघेही काही दिवस मुंबईत राहिले. त्यानंतर अमेरिकेला गेले.2015 मध्ये या दाम्पत्याला मुलगी झाली. काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर वडिलांना मुलीचा ताबा मिळाला. मात्र, वडील मुलीला आई-वडिलांकडे मुंबईत सोडून अमेरिकेला गेले. 2022 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने ग्रेसीला मुलीचा ताबा देण्याचा आदेश दिला. स्टॅलिन यांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते.

हेही वाचा : 

Back to top button