शनिवारी चंद्रग्रहण; या राशींचे भाग्य उजळणार; पण ही पथ्यं पाळाच | lunar eclipse religious significance | पुढारी

शनिवारी चंद्रग्रहण; या राशींचे भाग्य उजळणार; पण ही पथ्यं पाळाच | lunar eclipse religious significance

lunar eclipse religious significance | ग्रहण काळात स्मशानात जाऊ नका, जाणून घ्या कारण

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
 

या वर्षीची शेवटचे चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या रात्री म्हणजे २८ ऑक्टोबरला होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी चंद्रग्रहणला सुरुवात होईल. हे चंद्रग्रहण पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी संपणार आहे. (lunar eclipse religious significance)

या वर्षी एकूण दोन चंद्रग्रहण झाली. पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले, आताचे शरद पौर्णिमेच्या रात्रीचे ग्रहण २८ ऑक्टोबरला आहे. दुसरे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. यापूर्वी १४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण झाले होते. एकाच महिन्यात दोन ग्रहण होणे ही चांगली घटना मानली जात नाही. Lunar eclipse religious significance

ग्रहण कोठून दिसेल?  lunar eclipse religious significance

शनिवारी होणारे हे ग्रहण भारत, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिकेचा काही भाग येथून दिसेल.

भारतातून हे ग्रहण किती वाजता दिसेल?

शनिवारी ११ वाजून ३० मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल, ते पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी संपेल. स्पर्श रात्री १ वाजून ५ मिनिटांनी आहे, मध्ये १ वाजून ४४ मिनिटांनी तर मुक्ती २ वाजून २४ मिनिटांनी आहे. म्हणजे ग्रहणाचा एकूण कालावधी चार तास चोवीस मिनिटांचा आहे. यातील सर्वांत महत्त्वाचा कालावधी १ वाजून ५ मिनिटे ते २ वाजून २४ मिनिटं असा आहे. Lunar eclipse religious significance

या राशींना फलदायी | lunar eclipse religious significance

कन्या, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या राशींना ग्रहण शुभ राहील.

ग्रहण कालावधीत काय करू नये?

  • ग्रहण काळात आणि पुढील १५ दिवस रागावर नियंत्रण ठेवा. संतापावर नियंत्रण न ठेवणे महागात पडू शकते.
  • ग्रहण काळात स्मशानभूमी, मोकळ्या जागा, भग्न वास्तू येथे जाऊ नका. कारण ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा अधिक शक्तिमान झालेल्या असतात.
  • ग्रहण काळात नवीन नवीन काम सुरू करू नका, याचे कारण म्हणजे ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी झालेल्या असतात.
  • ग्रहण काळात पतीपत्नीने शरीरसंबंध ठेवू नयेत. यामुळे घरातील आनंद आणि शांतता बिघडू शकते.

ग्रहण काळात काय करावे?

  • ग्रहण काळात देवांची मंत्र म्हणावीत.
  • ग्रहणानंतर स्नान करावे आणि गरिबांना दानधर्म करावा
  • ग्रहणानंतर घराची शांती करावी
  • ग्रहण काळात गाईला चारा देणे, पक्ष्यांना अन्न देणे, गरिबांना कपडे देणे यातून लाभ मिळतो.

हेही वाचा

 

Back to top button