

पुढारी ऑनलाईन डेस्क : एलॉन मस्कच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लवकरच पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीचे सीईओ लिंडा याकारिनो यांनी ट्वीटरच्या नव्या फिचर्सबाबत माहिती दिली आहे. लिंडा याकारिनो यांनी याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मेसेंजिग, पेमेंट्स आणि बँकिंगचे फिचर्स लवकरच या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे. (X Payment Feature)
X च्या नवीन फिचर्सची घोषणा करताना, याकारीनोने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दोन मिनीटांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये X मध्ये नव्याने येणाऱ्या फिचर्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. याकारिनो या पोस्टमध्ये लिहितात, "X वर कोणते नवे फिचर्स उपलब्ध होणार आहे? याबाबतचे हे संकेत आहेत." (X Payment Feature)
पेमेंट करण्याव्यतिरिक्त, लवकरच प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाऊ शकते. आत्तापर्यंत, तुम्ही फक्त X वर मजकूराद्वारे इतरांशी कनेक्ट होऊ शकता. पण आता व्हिडिओ कॉलिंगपासून पेमेंट करण्यापर्यंत आणि नोकऱ्या शोधण्यापर्यंत सर्व काही X च्या मदतीने करता येणार आहे. (X Payment Feature)