RBI चा ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेला दणका, काय आहे कारण?

RBI चा ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेला दणका, काय आहे कारण?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मध्यवर्ती बँकेच्या विविध निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दोन बँकांना दणका दिला आहे. आरबीआयने आयसीआयसीआय (ICICI) बँकेला १२.१९ कोटी आणि कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) ३.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संबंधित बातम्या 

आयसीआयसीआय बँकेला कर्जाशी संबंधित उल्लंघन, अग्रिम-वैधानिक आणि आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड करण्यात आला आहे, असे आरबीआयकडून मंगळवारी सांगण्यात आले.

कोटक महिंद्रा बँकेला जोखीम व्यवस्थापित करण्याच्या निर्देशांचे आणि वित्तीय सेवांच्या आऊटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल दंड करण्यात आला आहे. तसेच रिकव्हरी एजंट आणि ग्राहक सेवेबाबतच्या RBI निर्देशांचे पालन न केल्याचाही ठपका या बँकेवर ठेवण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या बाबतीत, जोखीम मूल्यमापन अहवालांच्या तपासणीत असे दिसून आले की या बँकेने अशा कंपन्यांना कर्ज मंजूर केले ज्यात त्यांचे दोन संचालक हे संचालक म्हणून आहेत. नॉन-फायनान्सियल प्रोडक्ट्सच्या विक्रीचे मार्केटिंग केले आणि ठराविक कालावधीत आरबीआयला याबाबत अहवाल दिला नाही.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँक एक सेवा प्रदाता म्हणून ग्राहकांची योग्य काळजी घेण्यात अयशस्वी ठरली असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. कोटक बँकेने लोन ॲग्रीमेंट्समध्ये कर्जाच्या प्रीपेमेंट दंडाची तरतूद नसतानाही फोरक्लोजर शुल्क आकारले होते, असे आरबीआयने नमूद केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news