पारंपरिक गुंतवणूकदारांसाठी आदर्श फंड कोटक डेट हायब्रीड फंड

Published on
Updated on

सेबीच्या म्युच्युअल फंडांच्या नवीन वर्गीकरणानुसार म्युच्युअल फंडांचे पाच मुख्य प्रकार आणि त्याअंतर्गत येणारे 36 उपप्रकार आपण पूर्वीच्या एका लेखमालेत पाहिले आहेत. पाच मुख्य प्रकारांपैकी क्रमांक तीनचा प्रकार आहे Hybrid Schemes किंवा Hybrid Fund ! या Hybrid फंडांचेही सहा उपप्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे –

1) Conservative Hybrid Fund

2) a) Balanced Hybrid Fund

       b) Aggressive Hybrid Fund

3) Dynamic Asset Allocation or Balanced Advantage Fund

4) Multi Asset Allocation Fund

5) Arbitrage Fund

6) Equity Savings Fund

वरीलपैकी क्रमांक एकचा जो उपप्रकार आहे, Conservative Hybrid Fund. त्याची आपण माहिती घेऊ. हा डेट फंडाचा एक प्रकार आहे. यामधील किमान 75 टक्के आणि 90 टक्के गुंतवणूक Debt Instruments मध्ये म्हणजे Government Securities Treasury Bills, Bonds or Debentares करणे अनिवार्य आहे, तर किमान 10 ते कमाल 25 टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये करणे आवश्यक आहे.

Kotak Debt Hybrid Fund हा याच Conservative Hybrid प्रकारचा फंड आहे. भारतातील एका अग्रगण्य Financial Conglomerate, कोटक महिंद्रा गु्रपच्या Kotak mahindra mutual fund कंपनीचा हा फंड आहे. 2 डिसेंबर 2003 रोजी कंपनीने तो सुरू केला. फेब्रुवारी 2021 अखेर त्याचा Aum 403 कोटी रु. इतका होता. गेल्या दहा वर्षांतील त्याची आर्थिक कामगिरी पाहिली, तर सातत्याने Category Average पेक्षा अधिक परतावा या फंडाने दिलेला आहे. आणि त्यामुळे दहा वर्षे सातत्याने Category Average पेक्षा अधिक परतावा या फंडाने दिलेला आहे. आणि त्यामुळे दहा वर्षे सातत्याने तो पहिल्या पाच उत्तम फंडांच्या यादीत स्थान पटकावून आहे. गेल्या दहा वर्षांतील त्याची आर्थिक कामगिरी खालीलप्रमाणे आहे. 

फंडाचा पोर्टफोलिओ पाहिल्यास आपल्याला दिसून येते की, फंडाची इक्विटीमधील गुंतवणूक 26.43 टक्के आहे. आणि ती एकूण 46 कंपन्यांच्या शेअर्समध्ये करण्यात आली आहे. डेट इन्स्ट्रूमेंटसमधील गुंतवणूक 84.7 टक्के आहे आणि 35 सिक्युरिटीजमध्ये करण्यात आलेली आहे. इक्विटीमधील गुंतवणुकीपैकी अधिकांश गुंतवणूक Financial, FMCG, Energy, Construction या सेक्टर्समध्ये आहे. आयसीआयसीआय बँक, आयटीसी, रिलायन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इमामी हे पाच Top 5 Holdings आहेत.

कोणत्याही डेट फंडाचा Debt Portfolio हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण डेट फंडामधील गुंतवणूक ही Risk free मानली जात असली तरी ती प्रत्यक्षात Risk free नसते. तिलाही Credit risk आणि Interest  Risk असते. सिक्युरिटीजच्या पतमापन दर्जानुसार डेटमधील फंडाची गुंतवणूक खालीलप्रमाणे आहे.

sovereign Bonds      –      52.74 %  

AA                   –     16.11 %

AAA                   –     13.39 %

AAT                   –     2.44%

Conservative Hybrid फंडामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे उदिष्ट निश्चित 

असले पाहिजे. या प्रकारचे फंड हे बँकेतील मुदतबंद ठेवींपेक्षा थोडे अधिक रिटर्नस देतात कारण फंडाची थोडी गुंतवणूक ही इक्विटीजमध्ये होत असते. परंतु मार्केट जेव्हा तेजीत असते तेव्हा हेच रिटर्नस गुंतवणूकदारांना अत्यल्प वाटून त्यांची निराशा होऊ शकते करण इक्विटीमधील कमी गुंतवणुकीमुळे तेजीचा अल्प लाभ या फंडाच्या वाट्याला येतो.

Kotak Debt Hybrid Fund हा टॅक्सेशनच्या द़ृष्टीने डेट फंडाचा प्रकार आहे. कारण यातील 75 टक्के किंवा अधिक गुंतवणूक Debt Instruments मध्ये होते. कोणत्याही डेट फंडाचे टॅक्सेशन हे तुम्ही त्या फंडामध्ये किती कालावधीकरिता  गुंतवणूक केली होती, त्यावरून ठरते. तुम्ही जर या फंडामधून तीन वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतली, तर तुमचा लाभ हा Short Term Capital gain समजला जातो. त्यानुसार हा लाभ तुमच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट होतो आणि तुमच्या Income tax slab नुसार तुम्हाला त्यावर कर भरावा लागतो. 

जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा अधिक काळ 

या फंडामध्ये गुंतवणूक ठेवली, तर तुमचा लाभ Long Term capital gain समजला जातो आणि मग तुम्हाला Indexation चा लाभ मिळतो. म्हणजेच Indexation चा लाभ वजा करून 20 टक्के इतका कर तुम्हाला भरावा लागतो. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news