लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मिळणार विठ्ठल दर्शन! | पुढारी

लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मिळणार विठ्ठल दर्शन!

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : विठ्ठल दर्शन : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा भरत आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील सुरु आहे. दि. 15 रोजी कार्तिकी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. मात्र, लहान मूले, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, गुरुवार दि. 10 रोजी शासन आदेश काढून सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी दर्शनाकरीता खूली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना पर्वणीच ठरणार आहे. मंदिर समितीने अंमलबजावणी देखील सुरु केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर तब्बल 20 महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरत आहे. कोरोना नियम व अटीनुसार यात्रा भरवण्यात येत आहे. याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे. तर लहानांपासून अबालवृध्दांपर्यंत सर्वजन श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आसुसलेले आहेत. त्यामूळे कार्तिकी यात्रा सोहळ्याला राज्यभरातून व परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचे नियम पाळत 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसापुर्वी देखील मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना याबाबत विचारले असता, मंदिर समितीकडे नियमावली अलेली नसल्याने दि. 29 सप्टेंबर रोजी च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याच मंदिरात प्रवेश नाही. त्यामूळे याही कार्तिकी यात्रेत हाच नियम ठेवून 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरीता सोडले जाणार नसल्याचे गुरव यांनी सांगीतले होते.

दर्शनाकरीता लांबून येणारे सहकुटूंब भाविक, त्यांच्याबरोबर आलेले वृध्द मातापिता तसेच लहान मूले व गरोदर महिला यांना मंदिर प्रवेश मिळत नव्हता. त्यामूळे यांना विठ्ठलाच्या दारात येवून देखील दर्शन मिळत नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेवून राज्य शासनाने दि. 10 नोव्हेंबर रोजी नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी खूले करण्यात आलेली आहेत.

पुढे बोलताना गजानन गुरव म्हणाले की, भाविकांना सेवासुविधा पुरवण्याची जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, नगरपालिका प्रशासन, पोलीस व महसूल प्रशासनाचे राहणार आहे. त्यानुसार दर्शन रांगे, 65 एकर येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, हाच प्रशासनाचा उद्देश आहे. याकरीता कोरोनाचे नियम व अटीपाळून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येणार आहे. दर्शन रांगेत 150 खासगी कमांडो तैनात करुन सोशल डिस्टन्स पाळण्याचे काम केले जाणार आहे.

कोरोना लसीकरण अनिवार्य

65 वर्षापवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांचे व गरोदर स्त्रियांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच लसीकरणाच्या दुसर्‍या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा 65 वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांचे व गरोदर स्त्रियांना धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा देण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे, हात धुणे, थर्मलस्क्रिनींग अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिर समिती देखील सॅनिटायझर, मास्कची सोय करणार आहे.

गजानन गुरव (प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी मंदिर समिती)

Back to top button