LinkedIn वापरुन अशा पध्दतीने मिळवा मनासारखी नोकरी | पुढारी

LinkedIn वापरुन अशा पध्दतीने मिळवा मनासारखी नोकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

कोरोना काळात LinkedIn  वर संदर्भात विचारणा करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. LinkedIn वर येणारे बरेच वापरकर्ते हे नवीन आहेत. हे अॅप वापरणारे भवितांश नोकरीच्या संधी शोधत असतात. कोरोनामुळे मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कारखाने बंद झाले. अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे बेकारी वाढली आहे. अनेकजण नव्या नोकरीच्या शोधात आहेत.

डिजीटल युगात आता नोकरी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अनेकजण करत आहेत. अशा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी LinkedIn हे अॅप उत्तम पर्याय आहे. यावर नोकऱ्यांच्या अनेक संधी आपल्याला मिळू शकतात.

हे ही वाचा :

LinkedIn  वरती देशातील अनेक कंपन्या त्यांच्या नोकरी संदर्भातील रिक्त जागांची माहिती देत असतात. त्यावरुन अनेकांना नोकरी च्या ठिकाणी संपर्क करण सोप झाले आहे.

LinkedIn काय आहे?

LinkedIn ही जगातील क्रमांक एकची प्रोफेशन नेटवर्किंग आणि करियर डेव्हलपेमेंटची वेबसाइट आहे. या वेबसाईटचे ॲप सुध्दा आहे. LinkedIn वर तुम्ही अन्य यूजर्सशी बोलू शकता. तुमचा रिझ्यूम अपलोड करणे, तुमच्याबद्दल माहिती देणे व नोकरी शोधू शकता. ही एक मोफत साइट आहे. मात्र तुम्हाला प्रीमियम व्हर्जनसाठी पैसे भरावे लागतील. चांगल्या नोकऱ्यांसाठी हा उपयोगी प्लॅटफॉर्म आहे.

LinkedIn वर तुम्ही जगभरात कोठेही सहज नोकरी शोधू शकता. या वेबसाइटवर नोकरी शोधणे, रिझ्यूम पोस्ट या गोष्टी करता येतात.
LinkedIn चा वापर 200 देशांमध्ये केला जातो. 160 मीलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

LinkedIn वरती वापरकर्ता आपली प्रोफाईल बनवू शकतो. यावर आपण संपूर्ण माहिती भरु शकतो. यावर आपले शिक्षण किती झाले आहे. तसेच कामाचा अनुभव नोंदवू शकता.

आपल्या शिक्षणावरुन LinkedIn वरती नोकरी शोधू शकता. एखाद्या जाहीरातीस तुम्ही अर्जही करु शकता. यावरकी कंपनीने पाठवलेल्या जाहीराती वाचू शकता. तसेच शेअरही करु शकता. LinkedIn वरुन आपण सरळ कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करु शकतो.
LinkedIn प्रोफाईल वरुन तुम्ही रिझ्युम शेअर करु शकता. यावरुन नोकरी शोधू शकता.

LinkedIn वर काय मिळत?

कामाच्या क्षेत्रातील घडामोडी नवे शोध,कल्पना,उत्तम प्रकल्प याची माहिती होते. नवीन नोकरी साठी Job Notifications मिळण्याचे उत्तम ठिकाण. नोकरीसाठी LinkedIn वरून ओळखी करून अपेक्षित ठिकाणी नोकरीसाठी चांगला प्रयत्न होतो. आपण केलेले काही नवे संशोधन किंवा संशोधन पत्रिका याबद्दलची माहिती मांडण्याची उपयुक्त जागा आहे.

म्हणजे इतर लोकांचा सल्ला किंवा माहिती मिळण्यास नक्कीच उपयोग होतो. इतर काय शिकतात.अजून कोणते नवे कोर्स करायेच याची माहिती मिळते.

हे ही वाचा :

हे पाहा :

कोरोना संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतोय जोकर !

Back to top button