

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढती कोरोनाची संख्या पाहता खबरदारी म्हणून पुन्हा एकदा मंगळवारपासून सीमारेषा लाॅक केल्या आहेत.
विशेष करून हॉटस्पॉट कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आरटीपीसीआर आणि कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्याचे टाळले आहे.
अधिक वाचा
खुद्द कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रातून कर्नाटकात धावणाऱ्या बसेसना ओळखून रोखून धरीत माघारी धाडण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी चिक्कोडी विभागाचे डीएसपी मनोजकुमार नायक, सीपीआय संगमेश शिवयोगी, प्रभारी उपनिरीक्षक अनिलकुमार सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. तोळगी यांनी नाक्यावर पाहणी केली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी खुद्द कर्नाटक सरकारच्या बस रोखून धरल्या त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख यांनी भेट घेऊन प्रत्यक्ष सीमा तपासणी केली. तसेच नाक्यावर चालत असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
अधिक वाचा
यावेळी कर्नाटक राज्य सरकारच्या बेळगाव,हुबळी तसेच बंगळूर येथून महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता पुणे-मुंबई व इतरत्र धावणाऱ्या बसमधील प्रवाशांची तपासणी केली.
यावेळी तब्बल पाच बस मधील अनेक प्रवाशांकडे rt-pcr तसेच कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याचे दिसून आले.
सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी तसेच तहशील प्रशासनातील कर्मचाऱ्यांना रेड्डी यांच्यासह उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी धारेवर धरुन विचारणा केली.
गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपासून पुन्हा महाराष्ट्र कर्नाटक कोगनोळीसह इतर ठिकाणी असलेल्या सीमारेषा लाॅक करण्याचे आदेश रेड्डी यांनी दिले.
त्यानुसार निपाणी, चिकोडी, संकेश्वर, हुकेरी सदलगा पोलिस प्रशासनाच्या वतीने आता तातडीने याची अंमलबजावणी झाली.
एकूणच मंगळवारपासून पुन्हा एकदा आंतरराज्य प्रवेश आणखी कडक झाला आहे.
पोलीस प्रशासनाने सीमारेषा पुन्हा लॉक केल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासी व नोकर वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
स्वतःच्याच बसेस रोखल्या.
विशेष म्हणजे मंगळवारी दुपारी जिल्हा पोलिस प्रशासनाने महाराष्ट्रातून कोल्हापूर शहरात न जाणाऱ्या व कर्नाटकातील हुबळी,धारवाड ,बंगलोर येथे धावणाऱ्या पाच बसेस रोखून दरीत त्यांना माघारी धाडण्यात आले. यावेळी बसमधील अनेक प्रवासी वर्ग आमच्याकडे rt-pcr प्रमाणपत्र शिवाय अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याचे दिसून आले.दरम्यान ज्यांच्याकडे rt-pcr व कोरोना लस घेतली होती.अशा प्रवाशांनी आम्ही काढलेल्या तिकीट अंतरापर्यंत सोडून द्या, अशी विनवणी केली.मात्र पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून न घेता महाराष्ट्रातून कर्नाटकात आलेल्या पाच बसेस रोखून दरीत माघारी धाडीत बस चालक वाहकला धारेवर धरून तपासणीबाबत कडक सूचना केल्या.