आयुक्त अश्विनी भिडे यांनी भर पावसात स्विकारली अग्निशमन दलाची मानवंदना
कुर्ला : पुढारी वृत्तसेवा : अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज भर पावसात मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची मानवंदना स्विकारली. यावेळी आयुक्त मॅडमनी 'छत्र'छायेचा आसरा घेतला पण, मानवंदना देणारे जवान मात्र पावसात भिजत आपले कर्तव्य पार पाडत राहिले.
असाच प्रसंग काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीतही घडला होता. पण, अजित पवार यांनी जवानांना पावसात भिजावे लागेल म्हणून मानवंदना टाळली होती.
अधिक वाचा :
सोमवारी आयुक्त अश्विनी भिडे यांनी अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्या मुख्यालयात येणार म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी अग्निशमन दलाचे ६४ जवान सकाळी ९ वाजल्यापासूनच तैनात करण्यात आले होते. मात्र आयुक्त साहेबा ११ वाजता आल्या. त्या पाहणी करत असतानाच प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू लागला.
पण, जवान मात्र मानवंदना देण्यासाठी भर पावसात उभे राहिले. जोराचा पाऊस पडत असतानाच आयुक्त अश्विनी भिडे सुरक्षा रक्षकाने धरलेल्या छत्रीचा आसरा घेत तेथे आल्या. प्रचंड मोठ्या पावसातही त्यांनी मानवंदना स्विकारली. दुसरीकडे अग्निशमन दलाचे जवानांनी हा पाऊस आपल्या अंगावर झेलत तसूभरही चलबिचलता न दाखवता आपले कर्तव्य पार पाडले.
अधिक वाचा :
अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणानुसार आपले कर्तव्य पार पाडले. मात्र एवढ्या पावसात मानवंदनेच्या सोपस्कारसाठी सतत आव्हानात्मक परिस्थिती काम करणाऱ्यांना उभे करणे गरजेचे होते का? असा प्रश्न उपस्थित होतो.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी समयसुचकता दाखवत जवानांचा विचार केला. तसा विचार आयुक्त अश्विनी भिडे यांना का करता आला नाही?
हेही वाचले का?
पाहा : आरे कॉलनीतलं गावदेवीच्या मंदिराचा व्हिडिओ

