

नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घ्याल तर राजकीय जीवन संपुष्टात येईल, असा इशारा भाजपचे नेते ( BJP Leader) आणि निजामाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दिला. केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे विधानदेखील त्यांनी केले आहे.
( BJP Leader) अरविंद धर्मपुरी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना राव यांना इशारा दिला. 'जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडे धावतो. आता केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे, म्हणूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेत आहेत. आम्ही शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करणार नाही, असे कधी सांगितले नाही. केसीआर जनतेची दिशाभूल करत आहेत.'
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार आपल्या राज्यातील व्यक्तींना जाणीवपूर्वक पुरस्कार देत नाही, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी 'जीभ कापून टाकू' असा इशारा भाजप नेत्यांना दिला होता. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावरही टीका केली होती. 'तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमची जीभ कापून टाकू' असे म्हटले होते.