येवला: पुढारी वृत्तसेवा: येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मनोज जरांगे यांची आज (दि.९) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साह्याने पुष्प उधळण करण्यात येत होती. यादरम्यान गर्दी असल्यामुळे घाई गडबडीत जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला. त्यामुळे जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली झुकली. त्यामुळे बकेटमधून फुले उधळणारे युवक खाली कोसळली. (Nashik Manoj Jarange Patil)
त्यावेळी चौघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सुरुवातीला त्यांना येवल्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील एकाला नाशिक येथे हलवणार आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा