Tamil Nadu | तमिळनाडूत फटाक्यांच्या गोदामात स्फोट; ७ जणांचा होरपळून मृत्यू

Tamil Nadu
Tamil Nadu

पुढारी ऑनलाईन डेस्क: तमिळनाडूतील (Tamil Nadu) विरागलूरमध्ये (जि. तिरुचिरापल्ली) आज (दि.९) फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, या संदर्भातील वृत्त व्हिडिओ शेअर करत एएनआयने दिले आहे.

आज (दि.९) सकाळी कामगार दुकानात फटाके बनवण्यात व्यस्त असताना अचानक आग लागली. ती दुकानात पसरली.  ती वेगाने पसरली आणि दुकानात ठेवलेले फटाके फुटले. यावेळी मोठा आवाज होऊन स्फोट झाला. या दुर्घटनेत सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर भाजले गेले आहेत, असे येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news