West Bengal: प. बंगालमधील फटाका कारखान्यात स्फोट; ५ ठार, अनेकजण जखमी | पुढारी

West Bengal: प. बंगालमधील फटाका कारखान्यात स्फोट; ५ ठार, अनेकजण जखमी

पुढारी ऑनलाईन: पश्चिम बंगालमधील दत्तपुकुर येथील बेकायदा फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला, ही दुर्घटना आज (दि.२७ ऑगस्ट) सकाळी १० च्या सुमारास घडली. यामध्ये पाच जण ठार तर अनेकजण जखमी झाले असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे‘ ने दिले आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी आशिष घोष यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले की, कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नीलगंजच्या मोशपोल येथील कारखान्यात ही दुर्घटना घडली. बेकायदेशीररित्या सुरू असणार्‍या फटाक्यांच्या कारखान्यात अनेक लोक काम हाेते. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला. यामध्ये ५ जण ठार झाले असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत. या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याआधी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात अशाच प्रकारे झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:

Back to top button