Adultery | व्यभिचारी बायकोला पोटगीचा अधिकार नाही : कर्नाटक उच्च न्यायालय | पुढारी

Adultery | व्यभिचारी बायकोला पोटगीचा अधिकार नाही : कर्नाटक उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्यभिचारी नातेसंबंधात असणारी बायको पोटगी मागू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती राजेंद्र बदामिकर यांनी हा निकाल दिला आहे. संबंधित महिलने Protection of Women from Domestic Violence Act, 2005 च्या कलम 12 नुसार पोटगीची मागणी केली होती, ही याचिक न्यायमूर्तींनी फेटाळून लावली.

न्यायमूर्ती म्हणाले, “या खटल्यात याचिकाकर्ती बायको ही नवऱ्यासोबत प्रामाणिक नव्हती आणि तिचे शेजाऱ्याशी विवाहबाह्य संबंध होते, हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत. शिवाय याचिकाकर्ती या शेजाऱ्यासोबत राहात आहे.” बार अँड बेंच या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.


“जर याचिकाकर्ती महिला व्यभिचारी नातेसंबंध राहात असेल तर पोटगी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याचिकाकर्त्या महिलेचे मत आहे की तिने कायदेशीर लग्न केलेले असल्याने तिला पोटगी मिळाली पाहिजे, पण तिचे वर्तन प्रमाणिक नाही आणि ती व्यभिचारी संबंधात आहे, त्यामुळे या महिलेची याचिका ग्राह्य धरता येणार नाही.”

संबंधित याचिकाकर्त्या महिलेने नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले आहे, ते सिद्ध होऊ शकलेले नाही.

“याचिकाकर्ती महिला पोटगीची मागणी करत असेल तर तिने प्रामाणिक असले पाहिजे, ती नवऱ्याकडे बोट दाखवू शकत नाही.” याचिकाकर्त्या महिलने स्थानिक न्यायालयात पोटगीची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आली, पण सत्रन्यायालयाने नवऱ्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर संबंधित महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

हेही वाचा

Back to top button